पूजा सावंतने शेयर केला होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाली; ‘तुझ्या हृदयात…’

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा केल्याची बातमी शेयर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. पूजाचा नवरा कोण आहे याबद्दल सगळ्यांना उस्तुकता लागून राहिली होती. सोशल मिडियावर होणाऱ्या नवऱ्याच्या फोटो शेयर करून तिने त्याच्या चेहरा देखील दाखवला होता. पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण आहे. आता पूजाने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एक रोमँटिक फोटो शेयर केला आहे.

पूजा सावंतने (Pooja Sawant) इंस्टाग्रामवरून शेयर केला फोटो

पूजाने सिद्धेशसोबतचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. फोटोमध्ये पूजा सिद्धेशच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. फोटो शेयर करत तिने लहिले आहे कि, तुझ्या हृदयात जागा कशी निर्माण करायची हे मला माहिती आहे. फोटो शेयर करत पूजाने सिद्धेश चव्हाणला टॅग देखील केले आहे. सध्या पूजाचा हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री “We are engaged…” असं म्हणत तिच्या भावी नवऱ्यासोबतचे फोटो शेयर केले होते. फोटोमध्ये पूजा साखरपुड्याची अंगठी घातलेली देखील दिसत होती. हि पोस्ट शेयर केल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्षणभर विश्रांती चित्रपटामधून तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. त्याचबरोबर नीलकंठ मास्तर, सतरंगी रे, आता गं बया सारखी चित्रपटांसाठी देखील तिला ओळखले जाते.

हेही वाचा: प्राजक्ता माळीच्या “प्राजक्तकुंज”ची वास्तुशांती पूजा संपन्न, कुटुंबियांसोबत शेयर केले फोटो

Leave a Comment